Ad will apear here
Next
आषाढी वारीसाठी ‘माऊली विठ्ठलयात्रा’ अॅपची निर्मिती
पाच लाख पत्रावळ्यांचेही करण्यात येणार वाटप


पुणे
: वारीसोबत वारकऱ्यांचे सामान घेऊन चालणाऱ्या वाहनांना एका विशेष पासचे वाटप करण्यात येणार आहे. ही वाहने कुठेपर्यंत आलेली आहेत वा वाहतूक कोंडीत अडकली आहेत हे कळण्यासाठी ‘माऊली विठ्ठलयात्रा’ या मोबाइल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.

श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान आळंदीहून २५ जूनला होणार असून, या वर्षी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या माध्यामातून यंदा अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
 
या अॅपवर दिंड्यांच्या गाड्यांचे नंबर, दिंडीमालकाचे नाव, दूरध्वनी क्रमांक, वाहनचालकाचे नाव व त्याचा दूरध्वनी क्रमांक, गाडीचे ठिकाण दाखविणारे जीपीएस लोकेशन हा सर्व तपशील समाविष्ट केला जाईल. त्यामुळे वाहनचालक, दिंडीमालक, संस्थान कमिटी व पोलीस यंत्रणा यांच्यात संपर्क राखणे सहज शक्य होईल.

पालखी सोहळा प्लॅस्टिक व थर्माकोल मुक्त होण्यासाठी यंदा प्रत्येक दिंडीला एक हजार  याप्रमाणे सुमारे पाच लाख नैसर्गिक पत्रावळ्यांचे विनाशुल्क वाटप करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी अशाच प्रकारे सुमारे साडेचार लाख पत्रावळ्यांचे वाटप करण्यात आले होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZKHCB
Similar Posts
प्लास्टिक, थर्माकोलमुक्त दिंडी अभियान पुणे : आषाढी वारीत लाखो भाविक सामील झालेले असतात. त्यामुळे या काळात प्रचंड मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर केला जातो. यामुळे पर्यावरणालाही हानी पोहोचते. त्यामुळे थं क्रिएटिव्ह या संस्थेने प्लास्टिक, थर्माकोलमुक्त दिंडी अभियान सुरू केले आहे
फिनोलेक्स, ‘मुकुल माधव’तर्फे वारकरी सेवा पुणे : फिनोलेक्स उद्योग समूह आणि त्यांचे सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांची सेवा करण्यात आली. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावर विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे, फराळ वाटप व पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
पाऊले (उलट) चालती पंढरीची वाट! सोलापूर : दर वर्षीप्रमाणेच पंढरपूरच्या आषाढी वारीला येण्यासाठी लाखो वारकऱ्यांची पावले पंढरपूरच्या दिशेने पडू लागली आहेत. बापूराव गुंड या वारकऱ्याची गोष्ट मात्र थोडी वेगळी आहे. ते उलट चालून, म्हणजे ज्या दिशेला जायचे तिकडे पाठ करून ही वारी करतात. त्यांच्या या अनोख्या वारीचे यंदा बाविसावे वर्ष असून, आळंदी
माऊलींच्या पालखीचे दर्शन पुणे : टाळ मृदंगाच्या गजरात आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जयघोषात १७ जून रोजी सायंकाळी माऊलींच्या पालखीने आळंदीवरून पंढरपूरकडे प्रस्थान केले. त्या वेळी लाखो वारकऱ्यांच्या सोबत पालखी पंढरपूरकडे रवाना होण्यापूर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांनी आळंदी येथे जाऊन पालखीचे दर्शन घेतले. गिरीश बापट यांनी वारीमध्ये वारकऱ्यांसोबत माऊलींच्या जयघोषात सहभाग घेतला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language